बंद

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर!

    प्रकाशित तारीख : September 27, 2026
    11

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर!

    मौजे सायाळ, ता. लोहा येथे आज वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पाहणी केली. चारा लागवड, मुरघास, नेपियर गवत व कडबाकुट्टीच्या माध्यमातून पशुधनासाठी वैरण व्यवस्थापन सक्षम करण्याचे निर्देश दिले.
    यावेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. सखाराम खुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय कळसाईत, उपविभागीय अधिकारी विलास नरोटे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    #वैरणव्यवस्थापन #पशुसंवर्धन #दुष्काळ #नांदेड #ZpNanded #MaheshPatil