शाळांमध्ये भौतिक सुविधांची पूर्तता करण्याचे सीईओ पाटील यांचे निर्देश
जागरूक मुलगी, सुरक्षित मुलगी!
सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीत प्रतिष्ठानच्या वतीने ‘जागरूक मुलगी, सुरक्षित मुलगी’ अभियानांतर्गत Good Touch–Bad Touch व बालसुरक्षा मार्गदर्शनासाठी दोन जनजागृती रथांचा शुभारंभ करण्यात आला.
कंधार व लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये फिरून मुलींमध्ये सुरक्षा व आत्मजागृती निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महापौर कविता मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
#जागरूकमुलगीसुरक्षितमुलगी #बालसुरक्षा #GoodTouchBadTouch #GirlsSafety #WomenEmpowerment #GirlChildSafety #ChildSafety
#MaheshPatil
#ZPNanded
#महिलासक्षमीकरण #मुलींचीसुरक्षा #जनजागृती #प्रणिताताईदेवरेचिखलीकर #शांतीतप्रतिष्ठान #कंधार #लोहा #नांदेड #Nanded #Maharashtra #SafeGirlSafeSociety




