बंद

    दृष्टी आणि ध्येय

    जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची कमान आहे.या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लहान गावात विकासाची बोली लावण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती विविध माध्यमांतून ग्रामीण भागात पोहोचवून योजनांची अंमलबजावणी तीव्रतेने केली जाते ज्यामुळे जिल्ह्याचा विकास होतो
    जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.