प्रधानमंत्री आवास योजना
सन २०१६-१७ पासून सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या माहितीवरून या योजनेसाठी आवास सॉफट प्रणालीमध्ये Generated Priority List नुसार बेघर / २ खोल्या पर्यत कच्चे घरात वास्तव्य करणारे लाभार्थी यांची दि. १५ ऑगस्ट २०१६ व त्या दरम्यान होणा-या ग्रामसभेमध्ये मान्यता घेवून प्राधान्य क्रम यादी तयार करणेत आली. त्या प्राधान्य क्रम यादीची तालुकास्तरीय समिती व जिल्हास्तरीय समिती कडून मान्यता घेवून अंतिम यादी तयार करणेत आली. प्राधान्य क्रमानुसार लाभ देण्यात येतो. आवास प्लस प्रपत्र ड मध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सन २०२१ – २२ प्राधान्य क्रमानुसार लाभ देण्यात येतो.
प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा:- प्रति लाभार्थी रु. १,२०,०००/- शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रु.१२०००/- व मनरेगा अंतर्गत रु.२६०००/-
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतिक्षा यादीत असणे आवश्यक आहे. कमीत कमी २६९ चौ.फु.चे बांधकाम करणे आवश्यक आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
बेघर नागरीकाला घर मिळणे
अर्ज कसा करावा
सेस २०११ नुसार तयार करण्यात आलेल्या यादीतील लाभार्थी