बंद

    शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद,नांदेड

    • तारीख : 01/01/2022 -

    शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद,नांदेड.

    राबविण्यात  येत असलेल्या विद्यार्थी हिताच्या  योजनांची माहिती

    अ.क्र. योजनेचे नाव आवश्यक  कागदपत्रे लाभार्थी लाभाचे स्वरूप
    1 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 1) प्रथम खबरी अहवाल 2) स्थळ पंचनामा 3)मरणोत्तर पंचनामा 4) सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह मृत्यू प्रमाणपत्र व शवविच्छेदन अहवाल. इ.1 ली ते 12 वी पर्यंतचे सर्व मध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व विद्यार्थी अपघाती मृत्यू झाल्यास  1,50,000/-, अवयव निकामी झाल्यास  100000/- ,विद्यार्थ्यास शस्त्रक्रिया करावी लागल्यास रक्कम रू 100000/-पर्यंत रूग्नालयीन खर्च दिला जातो.
    2 नवभारत साक्षरता कार्यक्रम असाक्षरांचे व स्वंयसेवकांचे सर्वेक्षण ,टँगीग ऑनलाईन पध्दतीने उल्लास ॲपवर करण्यात येते. 15 वर्ष व त्यापुढील वयोगटातील सर्व असाक्षर व्यक्ती FLNAT परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.
    3 इ.5 वी 8 वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षेचे गुणपत्रक, बँक पासबुकची झेरॉक्स,शाळेचे बोनाफाईड. इ.5 वी 8 वीचे  शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यार्थी MAHADBT द्वारे वार्षीक 3000/-ते 7500/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
    4 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती (NMMS) NMSS परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक,पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र,जातीचा दाखला,आधार कार्ड,बोनाफाईड NMSS परिक्षेत शिष्यवृत्तीस पात्र  झालेला विद्यार्थी वार्षिक 12000/- रू.प्रमाणे 4 वर्षासाठी 48000/- रू शिष्यवृत्ती दिली जाते.
    5  दुर्बल घटकातील इ.1 ली ते 4 थी  (मुलींना) उपस्थिती भत्ता  गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मागणी प्रस्ताव सादर केले जातात. इयत्ता 1 ली ते 4 थी मधील अनुसूचित जाती/जमातीच्या दारिद्रय रेषेखालील  मुली  दररोज 1/- रू.प्रमाणे वार्षिक  220/-रूपये प्रती विद्यार्थी
    6 प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य परिशिष्ट-1 ,पालकाचे नोकरी प्रमाणपत्र,  विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड, विद्यार्थ्याची प्रवेश पावती व बोनाफाईड व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेले पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अभ्यासक्रमानुसार 3000/-ते 8000/-रू.रक्कम दिल्या जाते.
    7 माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य परिशिष्ट-1 ,पालकाचे नोकरी प्रमाणपत्र,  विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड, विद्यार्थ्याची प्रवेश पावती व बोनाफाईड व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेले पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अभ्यासक्रमानुसार 3000/-ते 8000/-रू.रक्कम दिल्या जाते.
    8 माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बोनाफाईड इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर स्तरावरील माजी सैनिकाचे  पाल्य. पाठ्यपुस्तके  व गणवेशासाठी रू.70/-ते 600/- पर्यंत वार्षिक.
    9 इयत्ता 10 वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मुख्याध्यापक यांचे शिफारसपत्र, विहित प्रपत्र, एपी पी 17 फॉर्म, संचमान्यता, प्रपत्र अ ब क, शाळेच्या बँक पासबूकची झेरॉक्स शासन मान्य अनुदानित व विनाअनुदानित इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणारे सर्व विद्यार्थी. इ.1 ली ते 10 वी इयत्तानिहाय रू.3/- 6रू./- सत्र फी व रू.2/-ते 5/- प्रवेश फी दर शाळांना वितरीत करण्यात  येते.
    10 इयत्ता 11 वी व 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलींना) मोफत शिक्षण प्राचार्य यांचे शिफारसपत्र, लेखाधिकारी (शिक्षण)यांचे स्वाक्षरीचे प्रपत्र ब, विहित प्रपत्र एपी पी 17 फॉर्म, संचमान्यता, प्रपत्र अ ब क, शाळेच्या बँक पासबूकची झेरॉक्स शासन मान्य अनुदानित व विनाअनुदानित इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये  शिकणाऱ्या सर्व  मुलींना. कनिष्ठ महाविद्यालय प्रथम व द्वितीय वर्ष अनुक्रमे  रू.83/-व रु.89/-  रू.प्रति विद्यार्थी
    11 ज्याच्या पालकांचे उत्पन्न रू.1 लाखापेक्षा अधिक नाही अशा इयत्ता 11 वी व 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलांना) मोफत शिक्षण प्राचार्य यांचे शिफारसपत्र, लेखाधिकारी (शिक्षण)यांचे स्वाक्षरीचे प्रपत्र ब, विहित प्रपत्र एपी पी 17 फॉर्म, संचमान्यता, प्रपत्र अ ब क, शाळेच्या बँक पासबूकची झेरॉक्स. इयत्ता 11 वी व 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुले) अनुदानितसाठी 77/- रू.प्रतिवर्ष विनाअनुदानितसाठी 250/- प्रतिवर्ष, अनुदानित किमान कौशल्यासाठी 100/- प्रतिवर्ष  आणि किमान कौशल्य विनाअनुदानितसाठी 250/- रू.प्रतिवर्ष.
    12 संस्कृत भाषा शिष्यवृत्ती मुख्याध्यापक यांचे शिफारसपत्र, मागील वर्षीचा मार्कमेमो, बँक पासबुकची झेरॉक्स इयत्ता 8 वीमध्ये संस्कृत विषय असणारे इ.9 वी व 10 वी चे विद्यार्थी  व 11 वी 12 वी मध्ये संस्कृत विषय असणारे विद्यार्थी इ.9 वी 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 100/-रू.प्रमाणे 10 महिण्यांसाठी व इ.11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 125/- रू. प्रमाणे 10 महिण्यांसाठी शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येते.
    13 मराठी भाषा फाउंडेशन  जोडपत्र-1, अल्पसंख्यांक दर्जाबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र, शाळा मान्यता, मानसेवी शिक्षकांचा अर्ज, संस्थेचा ठराव, शाळेचा ठराव, नियुक्ती आदेश, रूजू  अहवाल, शिक्षकांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, वर्गनिहाय पटसंख्या, शिक्षकांचे बँक पासबूक,आधार कार्ड मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र, संचमान्यता, सरल पार्टलवरील चालू वर्षातील माहिती, वेळापत्रक आणि प्रपत्र-1. 8 वी ते 10 वी चे  अमराठी शाळांतील  (इंग्रजी माध्यम वगळून) विद्यार्थी मानसेवी शिक्षकांना 5000/- रूपयाप्रमाणे 9 महिण्यांसाठी एकूण 45000/- रू मानधन देण्यात येते.
    14 छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा अर्ज, मु.अ.चे प्रपत्र क, तहसिलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे बँक पासबूक, बोनाफाईड प्रमाणपत्र,एन एम.एम.एस उत्तिर्ण प्रमाणपत्र. NMMSS परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठा, कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात प्रती विद्यार्थी वार्षिक  9600/-प्रमाणे 04 वर्षासाठी शिष्यवृत्ती  दिली जाते.
    15 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे सक्षम अधिकांऱ्यांचे  40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व  प्रमाणपत्र, मुख्याध्यापक यांचे शिफारसपत्र, पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अनुदानित शाळांतील  इ.9 वी व 10 वी तील विद्यार्थी प्रती विद्यार्थी वार्षिक 9000/-ते  14600/- हजार इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
    16 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती 10 वी चा मार्कमेमो,11 वी ला प्रवेश घेतलेला पुरावा,उत्पन्नाचा दाखला,जात प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र इ.11 वी 12 वी मधील शिकणारे सर्व  विद्यार्थी MAHADBT द्वारे राज्याकडून शिष्यवृत्ती ची रक्कम प्रती वर्ष ५००/- रु.जमा करण्यात येते.
    17 आर्थिकदृटया मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 10 वी चा मार्कमेमो,11 वी ला प्रवेश घेतलेला पुरावा,उत्पन्नाचा दाखला,जात प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र इ.11 वी 12 वी मधील शिकणारे सर्व  विद्यार्थी MAHADBT द्वारे राज्याकडून शिष्यवृत्ती ची रक्कम प्रती वर्ष ५००/- रु.जमा करण्यात येते.
    18 शालेय पोषण योजना निरंक इ.1 ली ते 8 वी पर्यंत सर्व अनुदानित शाळातील विद्यार्थी मध्यान्ह भोजन दिल्या जाते.
    19 जिल्हा बालभवन योजना आधार कार्ड 6 ते 14 वयोगटातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्याची विचारक्षमता वाढविण्यासाठी कार्य केले जाते.
    20 राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या  मागासलेल्या  120 विकास गटातील‍ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील  इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा करणे (योजनेतर योजना) निरंक इ.1 ली ते 4 थी पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थ्यांना गणवेश व लेखन साहित्य पुरविण्यात येते.
    21 12 व्या पंचावार्षिक योजनेत केंद्रपुरस्कृत  बहूक्षेत्र विकास कार्यकमांतर्गत मान्यताप्राप्त राज्यातील संबधित 9 जिल्हयातील 08 गट व 06 शहरासाठी सायबर ग्राम योजना निरंक राज्यातील संबधित 9 जिल्हयातील 08 गट व 06 शहरासाठी सायबर ग्राम योजना निरंक
    22 प्राथमिक शाळेतील पुस्तकपेढी योजना लाभार्थी मुलामुलींचे आधाकार्ड इ.1  ली ते 7 वी पर्यंतच्या SC ST NT VJNT आर्थिकदृष्टया कमकुवत सर्व विद्यार्थी लाभार्थी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यक्रमाची पुस्तके दिली जातात.
    23 माध्यमिक पुस्तकपेढी योजना लाभार्थी मुलामुलींचे आधाकार्ड इ.1  ली ते 7 वी पर्यंतच्या SC ST NT VJNT आर्थिकदृष्टया कमकुवत सर्व विद्यार्थी लाभार्थी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यक्रमाची पुस्तके दिली जातात.
    24 राज्यातील शैक्षणिदृष्टया मागासलेल्या  103 विकास गटातील‍ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील  इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके (योजनेतर योजना) लाभार्थी मुलामुलींचे आधाकार्ड   इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी (इंग्रजी मध्यम वगळून)   इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना  (इंग्रजी मध्यम वगळून)मोफत पाठयपुस्तके दिली जातात.
    25 धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्याचे बोनाफाईड, पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक पासबूक झेरॉक्स,धर्माचे स्वयंघोषित प्रमाणपत्र,गुणपत्रक, आधार कार्ड. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनातील इ. 1 ली ते 10 वी तील अल्पसंख्यांक विद्यार्थी प्रती विद्यार्थी प्रती वर्ष  1000/- MAHADBT द्वारे रक्कम खात्यावर जमा केली जाते.
    26 धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीनींसाठी बेगम हजरत महल  शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्याचे बोनाफाईड, पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक पासबूक झेरॉक्स,धर्माचे स्वयंघोषित प्रमाणपत्र,गुणपत्रक, आधार कार्ड. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनातील इ. 9 ली ते 12 वी तील अल्पसंख्यांक मुली 5 ते 6 हजार MAHADBT द्वारे रक्कम वाटप
    27 राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्याचे बानाफाईड  प्रमाणपत्र बँक पासबूक झेरॉक्स आधार कार्ड वय वर्ष 11.5 ते 13 वर्ष वयोगटातील इ.7 वी मध्ये असणारे अथवा 7 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 40000/ शिष्यवृत्ती
    28 स्वातंत्र्य  सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत स्वातंत्र्य  सैनिकाचा पाल्य असल्याचे प्रमाणपत्र इ.1 ली ते पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी पाठ्यपुस्तके  व गणवेशासाठी रू.70/-ते 600/- पर्यंत वार्षिक.
    29 मा.पंतप्रधान  व माननिय मुख्यमंत्राी यांनी घोषित केलेल्या विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेंतर्गत द्यावयाच्या शैक्षणिक सवलती निरंक विदर्भातील 6 जिल्हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी
    30 टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतीपुर्ती इ. 10 वी व 12 वी च्या परिक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत परिक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले इ.10 वी 12 वी चे विद्यार्थी परिक्षा फीस रक्कम
    31 अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था /मदरसाकरिता शिक्षण देणेबाबत योजना(SPQM) आधार कार्ड,विद्यार्थी यादी वय 6 ते 18 वयोगटातील मदरश्यातील विद्यार्थी मदरसामधील पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना शास्त्र गणित समाजशास्त्र हिंदी इंग्रजी हे आधुनिक विषय शिकविणे यासाठी नियुक्त शिक्षकाला 6 ते 8 हजार प्रतीमहा मानधन
    32 मदरसा मधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे योजना आधार कार्ड,विद्यार्थी यादी वय 6 ते 18 वयोगटातील मदरश्यातील विद्यार्थी मदरसामधील पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना शास्त्र गणित समाजशास्त्र हिंदी इंग्रजी हे आधुनिक विषय शिकविणे यासाठी नियुक्त शिक्षकाला 6 ते 8 हजार प्रतीमहा मानधन
    शिक्षणाधिकारी (योजना)
    जिल्हा परिषद नांदेड

    लाभार्थी:

    विद्यार्थी

    फायदे:

    शिष्यवृत्ती

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन

    संचिका:

    २३-०४-२५ YOJNA MAHITI 25 (136 KB)