अ.क्र. | विभागाचे नांव | अधिकारी/कर्मचा-याचे नाव | पदनाम | मोबाईल नंबर | विभागातील कामाचे स्वरुप |
1 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | एस.के.बाचेवार | लेखाधिकारी वर्ग – 2 (JJM) | 9518739022 | जजीमि अंतर्गत लेखा विषयक पंजिका तपासून अभिप्राय देणे, इ अनुषंगीक कामे. |
2 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | श्रीमती पी.आर.पवार | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | 9699977152 | विभागातील सर्व शाखेच्या पंजिका तपासून अभिप्राय देणे, कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे,जन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे इ अनुषंगीक कामे. |
3 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | डी. डी. पवार | कनिष्ठ सहाय्यक | 7588066795 | विभागातील आवक-जावक विषयक कामकाज, कार्यालयीन आस्थापना इ. कामे. |
4 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | विठ्ठल एच.चिगळे | लेखाधिकारी (SBM) | 9527789940 | स्वभामि विभागाची लेखा विषयक पंजिका तपासून अभिप्राय देणे, इ अनुषंगीक कामे. |
5 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | मिलींद ग्यानोबा व्यवहारे | माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ | 8626025825 | तालुका- अर्धापूर, भोकर, माहिती, शिक्षण व संवाद विषयक कामकाज, विभागा अंतर्गत जनजागृती करणे व इ अनुषंगीक कामे. |
6 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | विशाल विनायकराव कदम | स्वच्छतातज्ञ | 9921393030 | तालुका- लोहा, कंधार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, इ अनुषंगीक कामे. |
7 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | चैतन्य तांदुळवाडीकर | क्षमता बांधणी तज्ञ | 9028000010 | तालुका- मुदखेड,उमरी, क्षमता बांधणी विषयक कामकाज, प्रशिक्षण इ अनुषंगीक कामे. |
8 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | महेंद्र केशवराव वाठोरे | समाजशास्त्रज्ञ | 9890540509 | तालुका- हिमायतनगर, किनवट, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, ODF Plus, इ अनुषंगीक कामे. |
9 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | सुर्यकांत नागोराव हिंगमिरे | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 8308888304 | स्वभामि विभागाची आस्थापना विषयक कामे, ई-ऑफीस विषयक कामकाज, अहवाल तयार करणे, इ अनुषंगीक कामे. |
10 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | मानवतकर सुशिल विनोदराव | प्रशिक्षण व क्षमता बांधणी | 8275243933 | तालुका- धर्माबाद,हदगाव, जजिमि विभागाची आस्थापना विषयक कामे, प्रशिक्षण इ अनुषंगीक कामे. |
11 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | गोपिवार कृष्णा नागनाथराव | सनियंत्रण व मुल्यांकन सल्लागार | 9604246442 | तालुका- नांदेड, मुखेड,
विभागाची MIS विषयक कामे, इ अनुषंगीक कामे. |
12 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | डॉ. नंदलाल किशनराव लोकडे | माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार | 9403004162 | तालुका- बिलोली, नायगाव,
जजिमि विभागाची माहिती, शिक्षण व संवाद विषयक कामकाज, जनजागृती करणे व इ अनुषंगीक कामे. |
13 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | इंगोले निकिशा शिवाजीराव | सहाय्यक समन्वयक लेखा (JJM +SBM) | 8482915198 | तालुका- देगलूर, जजिमि विभागाची लेखा विषयक पंजिका तपासून अभिप्राय देणे, इ अनुषंगीक कामे. |
14 | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | देसाई कपेंद्र पुंडलिकराव | पाणी गुणवत्ता समन्वयक (JJM) | 9158885656 | तालुका- माहूर, जजिमि विभागाची पाणी गुणवत्ता विषयक कामे, इ अनुषंगीक कामे. |
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभाग अधिकारी /कर्मचारी माहिती.
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत डीपीआर अनुषंगिक कामाकरिता व्यवसायिक संस्था /स्वयंसेवी संस्था म्हणून काम करू इच्छिणाऱ्या संस्थांची सूची तयार करण्यासाठी आवेदन /अर्ज मागविणे बाबत |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(604 KB) /
|
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
नागरीकांची सनद |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(936 KB) /
|
अनुक्रमांक | शीर्षक | डाउनलोड |
---|---|---|
1 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १७ बाबी वरील माहिती | पहा(722 KB) |
2 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ नुसार प्रसिध्द करावयाची १ ते १७ बाबीवरील माहिती | पहा(187 KB) |
3 | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रपत्र १ ते १७ | पहा(385 KB) |
4 | माहितीचा अधिकार - बांधकाम भोकर विभाग | पहा(2 MB) |
5 | माहितीचा अधिकार समाजकल्याण विभाग | पहा(722 KB) |
6 | बांधकाम दक्षिण विभाग माहितीचा अधिकार - बांधकाम नांदेड विभाग | पहा(202 KB) |
7 | माहितीचा अधिकार (आरटीआय) - आरोग्य विभाग | पहा(5 MB) |
8 | माहितीचा अधिकार – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन | पहा(165 KB) |
9 | माहितीचा अधिकार - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (कक्ष) | पहा(466 KB) |
10 | माहितीचा अधिकार - महिला व बाल विकास विभाग | पहा(1 MB) |
प्राथमिक सेवा जेष्ठता यादी
अंतिम सेवा जेष्ठता यादी
प्राथमिक वास्तव्य जेष्ठता यादी
अंतिम वास्तव्या जेष्ठता यादी
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
कर्मचाऱ्याचा पडताळणी सूची |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(1 MB) /
|
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेची संक्षिप्त माहिती
1) वैयक्तिक शौचालय –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करणे व त्याचा वापर करण्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करणे ,त्याची शाश्वता राखणे,गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनमध्ये शोषखड्डा व खत खड्डा यांचे बांधकाम करणे,प्लास्टिक कचरा गोळा करणे,शाळा व अंगणवाडी तसेच महत्वाच्या सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये व ठिकाणांची स्वच्छताविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, गांव स्वच्छ ठेवणे ई. कामांचा समोवेश आहे.उपरोक्त सर्व सुविधांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्यमान उंचावणे व त्यांना अस्वच्छतेमुळे होणा-या आजारांपासून मुक्त ठेवणे हे मुळ उद्दीष्ट आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 12000/- (बारा हजार रूपये फक्त ) एवढा अनुदान मिळतो. या योजनेचा लाभ पुढील प्रवर्गातील पात्र कुटुंबांना प्राप्त होते – जसे की,
- APL (Above Poverty Line) –
- अनुसूचीत जाती (SC)
- अनुसूचीत जमाती (ST)
- अल्पभूधारक शेतकरी (Small & Marginal Farmer)
- भूमिहिन (Landless)
- अपंग (Handicap)
- महिला प्रधान कुटुंब (Women Headed Family)
- BPL (Below Poverty Line) –
- अनुसूचीत जाती (SC)
- अनुसूचीत जमाती (ST)
- सर्वसाधारण (General)
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त करण्यासाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे आहेत –
1) लाभार्थी कडे वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र.
2) शौचालय बांधकाम पूर्णत्वाचा दाखला.
3) ग्रामपंचायत चे प्रस्ताव –
4) यापूर्वी कुठल्याही योजनेतून अनुदान न घेतल्याचे प्रमाणपत्र.
5) ग्रामपंचायतचे नमुना नं.8 चा उतारा.
- उपयोगीता प्रमाणपत्र (लाभार्थीकडे शौचालयासाठी पाणी उपलब्ध आहे व तो शौचालयाचा वापर करीत असल्या बाबत)
- SBM च्या केंद्र संकेतस्थळावर लाभार्थीचे नांव नोंद असलेला ऑनलाईन क्रमांक.
- शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थी सहित कलर फाटोची प्रत.
- हमीपत्र – जर यापूर्वी कुठल्याही योजनेतून अनुदान घेतले असतील तर सदरील रक्कम लाभार्थी कडून कायदेशीर परत घेण्यासाठीचे हमीपत्र.
2) सार्वजनिक शौचालय –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील बसस्थानक, बाजाराचे ठिकाण, देवस्थान व यात्रा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय देण्याची सुविधा या योजने अंतर्गत करण्यात आलेली आहे. हा लाभ घेण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने जागा उपलब्ध असल्याचे ना हरकत प्रमाणपत्रासह प्रस्ताव जिल्हा कक्षास सादर करावा लागतो. सार्वजनिक शौचालय हे एकूण तीन लाख रुपयांचे असून यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत दोन लाख दहा हजार रुपये तर 15वा वित्त आयोगांतर्गत नव्वद हजार रुपयांची तरतूद केली जाते.
3) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत हागणदारीमुक्तीच्या दुस-या टप्प्यात गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) करण्यासाठी शौचालयासह गावस्तरावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. यासाठी गावस्तरावरील लोकसंख्या व कुटुंबसंख्येनूसार घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे आराखडे तयार केले जातात. या कामासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 70% हिस्सा तर 15वा वित्त आयोगातून 30% निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे.